कणकवली (प्रतिनिधी): उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिकेत किर्लोस्कर यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी मनोहर परब, नुपूर पवार, चारुशीला सावंत यांच्यासह अधिकारी, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.