मसुरे (प्रतिनिधी): श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अक्कलकोट ,थ्रोबॉल असोसिएशन सोलापूर, सोलापूर शहर व जिल्हा सॉफ्ट फुटबॉल असोसिएशन व महेशजी इंगळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व महाराष्ट्र थ्रोबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने 29 वि सब ज्युनिअर व 33 वी सीनियर राज्यस्तरीय थ्रोबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धा व चौथी सब ज्युनिअर ,ज्युनिअर सीनियर राज्यस्तरीय सॉफ्टफुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा मुले व मुली आणि पुरुष व महिला स्पर्धेचे उद्घाटन सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या शुभहस्ते आणि श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष श्री महेशजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व सॉफ्टफुटबॉलचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. नगरसेवक सीए विनोद भोसले व प्रथमेश इंगळे महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेचे सचिव सुनीलजी इंगोले ,सॉफ्टफुटबॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे राज्याध्यक्ष राजेंद्र माने यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्कलकोट येथे संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी कारागीर पेट्रोल पंपचे मालकसचिन किरणळी ,सॉफ्टफुटबॉल चे राज्य सहसचिव संदीप लंबे, थ्रोबॉल चे राज्य सहसचिव सुरेश हाधीमणी, राज्य संचालक राजेंद्र मागाडे ,जळगाव चे सचिव अशोक निकम सर, रायगडचे सचिव विलास मोरे ,धाराशिव चे बालाजी पवार ,नाशिकचे विलास निर्भवणे, सचिन तिकटे, शाहू सलगर हे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून विठ्ठल सरवदे संतोष पाटील सोलापूर ,शुभम झेंडे कोल्हापूर ,सुरेश हादीमणी कोल्हापूर, विलास निर्भवणे नाशिक हे काम पाहत आहेत. या स्पर्धेचे आयोजन नियोजनासाठी सॉफ्टफुटबॉल खेळाचे जनक थ्रोबॉलचे जिल्हाध्यक्ष प्रा.संतोष खेंडे, सचिव मारुती घोडके ,संचालक राजाराम शितोळे, तांत्रिक प्रमुख दत्तात्रय पाटील ,विठ्ठल सरवदे ,संतोष पाटील, अमोल कोकाटे ,गंगाराम घोडके प्राची बऱ्हाणपुरे ,श्रीधर गायकवाड ,प्रबुद्ध चिंचोलीकर ,प्रशांत कदम ,अविनाश राठोड, सतीश कुमार परदेशी हे परिश्रम घेत आहेत.