युवासेनेच्या शिरगांव येथील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
देवगड (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा सुस्थितीत यावी व चांगली आरोग्य सुविधा या मतदारसंघातील नागरिकांना मिळावी या उद्देशाने युवा सेना पदाधिकाऱ्यांमार्फत आरोग्य यंत्रणेच्या विरोधात आवाज उठविला होता. फक्त टीका न करता चांगली आरोग्य यंत्रणा निर्माण व्हावी व नागरिकांना चांगल्या आरोग्य सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने युवासेना पदाधिकाऱ्याने ठिकठिकाणी आंदोलने करून आवाज उठविला आरोग्य विभागा मार्फत नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात याव्यात या उद्देशाने युवा सेनेच्या माध्यमातून कणकवली विधानसभा मतदारसंघातील ६ ठिकाणी मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला ग्रामीण भागातून निश्चितपणे उस्फुर्त प्रतिसाद लाभणार आहे. असा आत्मविश्वास सिंधुदुर्ग जिल्हा युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी शिरगाव येथे आयोजित केलेल्या मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना केले .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना कणकवली विधानसभा मतदारसंघ च्या माध्यमातून मतदार संघातील ६ ठिकाणी नेत्र चिकित्सा मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा शुभारंभ देवगड तालुक्यातील शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथून बुधवारी सकाळी करण्यात आला या उद्घाटन सोहळ्यास शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर ,कणकवली विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख रवींद्र जोगल ,देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गावकर देवगड नगरसेवक विशाल मांजरेकर शिरगाव सरपंच समीर शिरगावकर, उपसभापती अमित साळगावकर कणकवली तालुका युवा सेनाप्रमुख उत्तम लोके विभाग प्रमुख बंटी पवार, उपतालुका युवासेना प्रमुख सचिन पवार, शाखाप्रमुख महेश मेस्त्री स् युवा समन्वयक मनोज भावे , शिवसेना जिल्हा महिला शिवसेना संघटक नीलम सावंत, पालव शिवसेना उपजिल्हाप्रमुख पूर्वा सावंत ,सौ प्रतीक्षा साटम ग्रामपंचायत स्नेहा मेस्त्री शहर प्रमुख वसंत साटम,विक्रांत नाईक हरी चव्हाण, वैद्यकीय अधिकारी ओम प्रकाश रामटेके आरोग्य विस्तार अधिकारी प्रतिमा वळंजु व अन्य उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांना पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन करून या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.या नेत्र चिकित्सा मोतीबिंदू तपासणी शिबिरात १६३ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन ४८ रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यात व तसेच ५० रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत.
याप्रसंगी बोलताना सतीश सावंत म्हणाले ,प्रत्येक व्यक्तीला नजर महत्वाची असून आपली नेत्र दृष्टी ही महत्त्वाचे आहे शिवसेनेच्या माध्यमातून ८० टक्के समाजकारणी २० टक्के राजकारण करत असताना युवा सेनेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम राबवत असताना या उपक्रमाच्या माध्यमातून शासन विविध योजनांचा लाभ मोफत सुविधा मिळवून देण्यासाठी युवासेना विशेष प्रयत्न करीत आहे. निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवासेनेच्या माध्यमातून एक नवी युवा पिढी उभारी घेत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात युवा सेनेच्या माध्यमातून एक नवा झंजावात आक्रमक होऊन आरोग्य चे प्रश्न हाती घेतले आहे संपूर्ण मतदारसंघात आरोग्य समस्या हा महत्त्वाचा प्रश्न असून शेवटच्या घटकापर्यंत या आरोग्य सोयी सुविधांचा लाभ मिळवून देण्यासाठी या शिबिराच्या माध्यमांचे आयोजन केले असून लोकाभिमुख जनजागृती अशा शिबिरांमधून निश्चितपणे होणार आहे. युवा शिवसेनेच्या माध्यमातून शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांचा लाभ आरोग्य योजनेचे प्रश्न सोडविण्यासाठी या पुढील काळातील युवा सेना आक्रमकपणे प्रयत्न करणार असून युवा सेनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिवसेनेला या संपूर्ण जिल्ह्यात एक नवी उभारी येत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी दोनशेहून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला यामध्ये 41 व्यक्तींवर युवा सेनेच्या माध्यमातून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.