हुमरस येथे रस्ता डांबरीकरण व खडीकरण कामाचा शुभारंभ

कुडाळ (प्रतिनिधी) : हुमरस पायरी स्टॉप ते मौनी महाराज मठ हुमरस येथील रस्त्यासाठी जिल्हा वार्षिक नियोजन निधीतून रुपये 5,00,000/- व बजेट मधून रुपये 10,00,000/- निधि भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंजूर झाला. प्रमुख उद्घाटक म्हणून संजय वेंगुर्लेकर भाजपा तालुकाध्यक्ष कुडाळ व रूपेश कानडे भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष यांच्या हस्ते खडीकरण व डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमासाठी मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते,सीताराम तेली-सरपंच, प्रवीण वारंग-उपसरपंच,श्रुती चिपकर-ग्रा.प.सदस्य,सुमन कुडकर-ग्रा.प.सदस्य,स्वप्ना वारंग-लंगवे-पंचायत समिति सदस्य,सोनू मेस्त्री,समीर मांगले,एकनाथ परब-शाखाप्रमुक शिवसेना,नीलेश तेली,दाजी वारंग,संतोष पाटकर,मधु कांदे, दडू लाड,गुंडू सावंत,सुदमदास मांगले,गोरक्ष वारंग,राकेश सावंत,स्वप्नील लंगवे,नारायण सातर्डेकर उपस्थित होते, सर्वांच्या वतीने भारतीय जनता पक्षाचे आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!