रेल्वेमध्ये चैन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास अटक 

पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांची दमदार कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : पनवेल रेल्वे पोलीस ठाणे येथील एका चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला व मागील दोन वर्षापासून फरार असलेला आरोपी इसम नामे दिलीप गोपाळ मिश्रा,वय 24 वर्षे,राहणार – रायसेन,मध्य प्रदेश हा कणकवली तालुक्यात फिरत असल्याची पोलीस निरीक्षक यादव यांना गुप्त माहितीगाराने माहिती दिल्यावरून लागलीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ए.के.हाडळ व पथक यांनी त्याचा कणकवली परिसरात शोध घेतला असता,सदर आरोपीत इसम हा नरडवे नाका बसस्टॉप जवळ,ता- कणकवली येथे संशयितरित्या फिरत असताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणण्यात आले.त्याचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्याच्यावर 01) मुर्देश्वरा पोलीस ठाणे,भटकळ, राज्य कर्नाटक

 02) पनवेल रेल्वे पोलीस ठाणे

 03) कल्याण रेल्वे पोलीस ठाणे

 04) सिकंदराबाद रेल्वे पोलीस ठाणे, राज्य हैदराबाद या ठिकाणी रेल्वेमधील 14 ते 15 चेन स्नेचिंग व जबरी चोरीचे अनेक गुन्हे असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीमध्ये त्याने 29/10/23 रोजी कणकवली रेल्वे स्थानक येथे तक्रारदार  सौ सुनीता सूर्यकांत पाताडे,राहणार करंजे आपटेवाडी तालुका कणकवली हिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याची माळ जबरीने खेचून नेले असलेबाबत कबुली दिलेली असून त्या अनुषंगाने कणकवली पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर क्रमांक 326/23, भादवि कलम 392 मध्ये त्यास अटक करण्याची कार्यवाही चालू आहे. सदरची कामगिरी कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हाडळ, पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे व पोलीस शिपाई माने यांनी केलेली आहे.  गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शरद देठे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!