कलमठ मध्ये 10 डिसेंबर रोजी युवासेना कलमठ तर्फे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

शिवसेना (उबाठा ) युवासेना कलमठ आणि वालावलकर रुग्णालय डेरवण यांचा संयुक्त उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी): शिवसेना उबाठा आणि वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 10 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा कुंभारवाडी कलमठ येथे सकाळी 9: 30 ते दुपारी 2 वाजण्याच्या दरम्यान मोफत आरोग्य तपासणी आणि शस्त्रक्रिया नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या आरोग्य शिबिरात अस्थीरोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ,सर्जन, नेत्ररोगतज्ञ, जनरल मेडिसिन नाक कान घसा तज्ञ हे विशेष तज्ञ डॉक्टर मोफत तपासणी करणार आहेत. हर्निया, चरबीच्या गाठी, नाक कान घसा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, अल्सर, थायरॉईड, हायड्रोसेल, फायब्रोडेनोमा, महिलांची गर्भाशय तपासणी, गर्भाशय शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स,पित्ताशयातील खडे, ब्रेस्ट कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, इंप्लान्ट रिमूव्हर, मूळव्याध, नाकाचे हाड वाढणे, अँपेंडिक्स, प्रोस्टेट ग्रंथी, प्रोस्टेटप्रथि, कानाच्या पडद्याची तपासणी, मुतखडा तसेच जनरल तपासणी अगदी मोफत केली जाणार आहे. आरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत जिल्हाप्रमुख संदेश पारकर, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव आदी उपस्थित राहणार आहेत. कलमठ दशक्रोशीतील ग्रामस्थांनि या आरोग्य शिबिराचा लाभ घेत आपली मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन कलमठ युवासेनेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी धीरज मेस्त्री मोबाईल 8805831281, अनुप वारंग मोबा.9822361036, राजू राठोड मोबा.9422339922, विलास गुडेकर मोबा.9422435602, निसार शेख मोबा.9850472907, नितेश भोगले मोबा9156110735 सचिन आचरेकर मोबा. 9422564539 यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!