तुळसचे शासकिय जंगलात सप्तरंगी या औषधी वनस्पतीची अवैध वृक्षतोड करुन त्याची मुळे काढणारे वनविभागाचे जाळयात

वेंगुर्ले (प्रतिनिधी): सावंतवाडी वनविभागाचे अखत्यारितील कुडाळ वनपरिक्षेत्रातील गठ परिमंडळाअंतर्गत तुळस नियत क्षेत्रातील मोजे तुळस गावामध्ये वनविभागाचे 171:57 हेक्टर राखीव वन आहे. दि 07/12/2023 रोजी वनपाल मठ व वनरक्षक तुळस स्टाफसह मौजे तुळस कक्ष क्रमाक 138 मधील वनक्षेत्राकडून सप्तरंगी झाडाची तोड करुन त्याची मुळे काढून ती वाहतुक होत असलेबाबत मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार जंगल पायथ्याशी दबा धरून बसलो असता रात्री 9.00 वाजताचे सुमारास 5 इसम डोक्यावरुन प्लॅस्टिक पोती घेऊन येत असताना जंगल पायथ्याशी अटकाव करुन चौकशी केली असता, त्यांचेकडील 05 प्लॅस्टिक पोत्यामध्ये सप्तरंगी (Salacia Oblonga) आढळून आले त्यांचेकडे अधिकची चौकशी केली असता, जगल पायथ्याशी झाडीझुडपात सप्तरंगी मुळाने भरलेली आणखीन 03 पोती काढून दाखविली त्याच बरोबर सदर मुळे खोदण्यासाठी वापरण्यात आलेली अवजारे (कुंदळ-01 कोयता-01 व भाला सदृश्य हत्यार-01) दाखविली. त्यानंतर दोन पंचांना बोलवून वस्तुस्थितीचा व जप्ती पंचनामा करणेत आला. त्यानतर आरोपी 1 ते 5 यांची वैदयकिय तपासणी करून त्यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले व मठ गुन्हा क्रमांक सी 13/2023 नोंदवून तपास सुरु केला.

दि. 08/12/2023 रोजी चौकशी कामी ताब्यात घेतलेले आरोपी क्र. 1 ते 5 यांची रेंज कार्यालय कुडाळ येथे चौकशी करुन त्यांचे जबाव नोंदविणेत आले. आरोपी यानी गुन्हा कबुल केल्याने त्यांना पंचासमक्ष अटक पंचनामा नोंद करून अटक करणेत आली. चौकशीमध्ये आरोपी 1 ते 5 यांनी संगनमत करुन शासकिय राखीव वन कक्ष क्रमांक 138 मध्ये अपप्रवेश करून सप्तरंगी झाडाची तोड करुन त्याची मुळे खोदुन काढून विक्रीच्या उद्देशाने वाहतुक करण्याच्या गुन्हाची आरोपीनी कबुली दिल्याने पंचासमक्ष अंग झडती घेऊन त्याना अटक करणेत आली. आरोपींना आज रोजी मे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वेगुर्ला यांचे न्यायालयात हजर केले असता, आरोपी क्र. 1 ते 5 यांना दि. 11/12/2023 पर्यंत फॉरेस्ट कस्टडी देण्यात आलेली आहे. गुन्हयाचा तपास वनक्षेत्रपाल कुडाळ सं. श्री. कुंभार हे मा. एस. नवकिशोर रेड्डी उप-वनसंरक्षक सावंतवाडी व मा. एस. के. लाड, सहा वनसंरक्षक (खा कुतो व वन्यजीव) सावंतवाडी यांचे मार्गदर्शनाखाली करत असून, तपास प्रकरणी वनपाल गट सावळा कांबळे, वनपाल नेरुर त.हवेली अनिल राठोड, वनरक्षक तुळस विष्णू नरळे, यनरक्षक मठ सुर्यकांत सावंत, वनरक्षक उपवडे बदाम राठोड वनरक्षक बाडोस अमोल पटेकर, बनरक्षक माणगांव अनिकेत माने व वनमजूर तुळस सतोम इब्रानपुरकर सहकार्य करत असून, स्थानिक ग्रामस्थ रमाकांत दुंबरे व जया विरोडकर यांचे सहकार्य लाभले. सदर गुन्हात सप्तरंगी वनस्पतीची मुळे भरलेली 08 पोती गुरे कारणसाठी वापरण्यात आलेली अवजारांसह एकूण 12550/- (बारा हजार पाचशे पन्नास मात्र या मुद्देमाल जप्त करणेत आला आहे. गुन्हयाचा तपास प्रगतीवर असून, सदर गुन्हयात आणखीन आरोपीचा समावेश असून त्यांना दोन दिवसांत ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती वनक्षेत्रपाल यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!