कणकवली (प्रतिनिधी): मुंबई – गोवा महामार्गावर जाणवली ब्रिजवर हुंबरठ वरून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या इर्टीगा कार एमएच ४३ बीयु ७७६६ कारला मागवून येणाऱ्या १६ चाकी कंटेनर ची धडक बसून अपघात झाला. या अपघातात इर्टीगा कारचे उजव्या बाजूचे मोठे नुकसान झाले आहे. धडक एवढी जबरदस्त होती की इर्टीगा कार ही हायवेच्या बाजूला असलेल्या डिव्हायडरवर चढली. यावेळी घटनास्थळी कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण हे दाखल झाले होते. तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी देखील घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याबाबत अधिक माहिती कणकवली पोलीस घेत आहेत.
कणकवलीत कार आणि कंटेनरची धडक












