त्या धाडसा बद्दल रवीकिरण इंगवले यांनी केला त्या पट्ट्याचा सत्कार

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे): कोल्हापूर,शुक्रवारी मध्यरात्री माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या राजेंद्र वरपे आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप केला आहे . याप्रकरणी राजेंद्र वरपे यांनी क्षीरसागर यांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार देऊन देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याबद्दल आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांना निवेदन देण्यात आले. दोन दिवसांपूर्वी शनिवार पेठ इथं माजी आमदार क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दहशत माजवून राजेंद्र वरपे यांना मारहाण केल्याचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाले. त्याच कुटूंबातील एका पंधरा वर्षाच्या मुलांने वडिलांच्या वर हल्ला झाला म्हणून त्याला चोख प्रतिकार म्हणून उत्तर दिले म्हणून त्याबद्दल त्याचा रवीकिरण इंगवले आणि ठाकरे गटाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रवीकिरण इंगवले, सुनिल मोदी,विशाल देवकुळे, हर्षल सुर्वे, माजी नगरसेवक धनंजय सावंत,अवधूत साळोखे, राहुल माळी, राजेंद्र पाटील, दत्ताजी टिपूगडे, सुहास डोंगरे, दिपाली शिंदे, दिलीप देसाई, दिनेश साळोखे, अभिजीत पाटील, महेश उत्तुरे, संजय जाधव, शशिकांत बिडकर, विराज ओतारी, स्वरूप मांगले, विवेक काटकर, अभिजीत ओतारी, राजू सांगावकर,धनाजी यादव, विकी मोहिते, विनय क्षीरसागर, विजय नाईक, रुपेश रोडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!