आडेली जि. प. मतदार संघातील भाजपा सरपंच व उपसरपंचांची आग्रही मागणी
भाजपाच्या मागणीची तातडीने दखल घेत आठवड्यातून दोन दिवस ( मंगळवार व गुरवार ) वेतोरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात डाॅक्टर उपलब्ध रहाणार
वेंगुर्ले (प्रतिनिधी): वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे येथे पशुवैद्यकीय दवाखाना अस्तित्वात आहे. परंतु वैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने गेले कित्येक महीने सदर दवाखाना बंद स्थितीत आहे. त्यामुळे आडेली, मठ, पालकरवाडी, वेतोरे, खानोली, दाभोली, वायंगणी या ग्रामपंचायत हद्दीत रहाणार्या पशुपालक शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच दुसर्या ठीकाणी उपचारासाठी जावे लागत असल्याने गोर गरीब शेतकऱ्याला नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच गुरांचे प्रतिबंधक लसीकरण होत नसल्याने गुरांना वेगवेगळे आजार होऊन, गुरे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत वेतोरे येथील पशुवैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त असल्यामुळे कांबळेवीर येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे . त्यामुळे आडेली जि.प. मतदार संघातील पशुपालक शेतकऱ्यांच्या जनावरांना काही इजा झाल्यास वेळेवर जनावराना वैद्यकीय सेवा मिळत नाही. याची दखल घेत आडेली जि.प.मतदार संघातील भाजपाचे पदाधिकारी व सरपंच / उपसरपंच यांनी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त , पशुसंवर्धन अधिकारी – वेंगुर्ले चे डाॅ.चव्हाण यांची भेट घेऊन तातडीने वेतोरे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करावा, अशी आग्रही मागणी केली. या मागणीची तीव्रता लक्षात घेऊन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक होण्यापूर्वी आठवड्यातुन दोन दिवस, म्हणजेच मंगळवार व गुरवार या दिवशी वेतोरे येथील दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी हजर रहातील असे अभिवचन भाजपा सरपंच व पदाधिकाऱ्यांना दिले. यावेळी पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, मठ उपसरपंच बंटी गावडे, वायंगणी उपसरपंच रवींद्र धोंड, वेतोरे शक्तिकेंद्र प्रमुख सुधीर गावडे , आडेली शक्तिकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर, पालकरवाडी बुथप्रमुख दिपक करंगुटकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, जिल्हा का. का.सदस्य मनवेल फर्नांडिस, निलेश मांजरेकर, आनंद मेस्त्री, सायमन आल्मेडा, दादा तांडेल इत्यादी उपस्थित होते.