तळेरे (प्रतिनिधी) : कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झालेल्या खासदार महोत्सव अंतर्गत ‘चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर’ राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 33 खेळाडूंनी घवघवीत संपादन केले असून स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. काता आणि कुमिते कराटे प्रकारात पार पडलेल्या या स्पर्धेला राज्यभरातून १ हजारपेक्षा अधिक खेळाडुंनी सहभाग दर्शविला होता.
सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशन मार्फत सहभागी झालेल्या कासार्डे हायस्कुलच्या खेळाडूंनी या ठिकाणी चमकदार कामगिरी करीत अनेक पदकाची लयलूट केली.
काता प्रकारात सुवर्णपदक विजेता खेळाडू अमोल जाधव, रौप्य पदक विजेते खेळाडू कु. विधी चव्हाण,तुषार जाधव, कांस्यपदक विजेते खेळाडू कु.धैर्या परब, कु.आकांक्षा आडिवेकर, कु.रिद्धी राणे, कु.दुर्वा पाटील ,वैदेही राणे, कु.साक्षी तेली,कु.आसावरी तानवडे,कु.रिध्दी परब, कुमिते (फाईट ) प्रकारात सुवर्णपदक विजेते खेळाडू कु.विधी चव्हाण, कु.आसावरी तानवडे, कु.समिक्षा येंडे,अमोल जाधव,किशोर देवासी, विश्वास चव्हाण रौप्यपदक विजेते खेळाडू कु. धैर्या परब, आकांक्षा आडिवरेकर,की. दुर्वा पाटील,कु.साक्षी तेली, सार्थक गुरव, कु.समृद्धी चौगुले, कु.भक्ती लाड, कु.रिद्धी राणे, कु.सना शेख, कु.शिवानी जाधव, कु.नंदिता मत्तलवार, कु.वैदही राणे, कु.मृणाल सावंत, कु.लावण्या झोरे, कु.रिद्धी परब,भावेश नारकर,आर्यन दराडे, आराध्य राणे, आदर्श जाधव, निखिल तेली, दुर्वास पवार, विघ्नेश पेडणेकर,शुभम राठोड, रूक्षराज घुगे, दक्षराज राणे,दीपक जाधव व तुषार जाधव या सर्व खेळाडूंनी कांस्यपदकावर मोहर उठवली. हे सर्व विद्यार्थ्यी सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशनच्या कासार्डे शाखेत अनेक वर्षांपासून सराव करीत आहेत.
यशस्वी खेळाडूंना विद्यालयचे क्रीडा शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा कराटे असोसिएशन सचिव दत्तात्रय मारकड, प्रशिक्षक अभिजित शेट्ये, .दर्शना मारकड,सोनू जाधव व तुषार जाधव इतर प्रशिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या गुणवंत खेळाडुंचे कासार्डे विकास मंडळ, मुंबई चे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, मुख्याध्यापक एम.डी.खाड्ये, प्र.मुख्याध्यापकएन.सी. कुचेकर,प्र.पर्यवेक्षक एस.डी.भोसले आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. या खेळाडूंचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.