खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात आलेला बाल कला क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव नुकताच जि.प.शाळा नडगिवे नं.१ येथे नडगिवे गावच्या सरपंच माधवी मण्यार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नडगिवे ग्रा.पं.उपसरपंच भूषण कांबळे, माजी सरपंच अमित मांजरेकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार संतोष पाटणकर,जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ चे केंद्रमुख्यद्यापक प्रदीप श्रावणकर, नडगिवे जि.प.शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष सतीश कर्ले,उपाध्यक्ष साक्षी आंबेरकर,माजी अध्यक्ष अरुण कर्ले,तंटामुक्ती समिती अध्यक्ष सुनील कर्ले, ग्रा.पं.सदस्य प्रशांत धावडे, शा.स.सदस्य रवींद्र सुतार,नडगिवे जि.प.शाळेच्या मुख्यद्यापिका अनिता पाटकर, खारेपाटण केंद्र शाळा नं.१ समिती उपाद्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे, रामेश्वर नगर, खारेपाटण जि.प.शाळा समिती उपाध्यक्ष जान्हवी सुतार,टाकेवडी खारेपाटण जि.प.शाळा समिती उपाध्यक्ष विश्वनाथ गुरव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
“अधिक उंच,अधिक जलद,अधिक बुद्धिमान” हे ब्रीद वाक्य घेऊन राबविण्यात येणाऱ्या जिल्हा परिषद शाळांच्या या क्रीडा महोत्सवात अगदी ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना देखील यामध्ये सहभाग घेऊन आपली गुणवत्ता सादर करण्याची संधी मिळते.व अशा मोहस्त्ववातूनच विद्यार्थ्यांच्या कला गुणांना खऱ्या अर्थाने वाव मिळत असतो. असे भावपूर्ण उदगार नडगिवे गावच्या सरपंच सौ माधवी मण्यार यांनी खारेपाटण केंद्र स्तरीय बाल क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या नडगिवे जि.प.शाळा क्र.१ येथील उद्घघाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलताना काढले.
या क्रीडा महोत्सवाच्या विविध स्पर्धांच्या कार्यक्रमाची सुरवात नडगिवे गावचे उपसरपंच भूषण कांबळे यांच्या शुभहस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आली.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा प्रतिज्ञा देण्यात आली. प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाळेच्या मुख्याद्यापिका अनिता पाटकर यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या क्रीडा महोत्सवात खारेपाटण केंद्र अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांनी विविध खेळात सहभाग घेतला होता. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खारेपाटण केंद्र मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर यांनी केले.तर संपूर्ण कार्यक्रमांचे सूत्रसंचालन आभार संदीप कदम सर यांनी केले.यावेळी मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी तसेच केंद्रातील शिक्षक उपस्थित होते.