मालवण (प्रतिनिधी) : नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडल्या बद्दल मालवण येथील मच्छिमार, वाळू व्यवसायिक तसेच मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने आ.वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.
यावेळी शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,माजी बांधकाम सभापती मंदार केणी,मंदार ओरोसकर,बाबी जोगी,महेश जावकर,किरण वाळके,सेजल परब, संमेश परब, दीपा शिंदे,तपस्वी मयेकर,गणेश कुडाळकर,मनोज मोंडकर,यशवंत गावकर,हेमंत मोंडकर,माधुरी प्रभू,मिनाक्षी शिंदे,सुर्वी लोणे,अंजना सामंत,मच्छिमार हेमेंद्र मेस्त,बंटी मोंडकर,वाळू व्यवसायिक गणेश तोंडवळकर,ओंकार पाटील,सतीश पेडणेकर,सचिन बागवे,प्रसाद आंबेरकर,निलेश नाईक,रोहित नार्वेकर,स्वप्नील सावंत,धनंजय लब्दे,विपुल आचरेकर,ललित पाटकर,बंटी पेडणेकर,राहुल गोलतकर,प्रणय कांबळी,समीर मेतर,प्रमोद कांबळी,अमोल वस्त,सुजय पुजारे,भावेश कांबळी यांसह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व महिला उपस्थित होत्या.