खारेपाटण (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या खारेपाटण केंद्र स्तरीय बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवात जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन करीत बेस्ट चॅम्पियन शिप स्कूल सन्मान प्राप्त केला. या सर्व गणवंत विद्यार्थ्यांचा नुकताच नडगिवे गावच्या सरपंच सौ माधवी मण्यार व उपसरपंच श्री भूषण कांबळे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव व सत्कार करण्यात आला. तर खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने देखील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावच्या जि.प.शाळा नं.१ येथे संपंन झालेल्या या क्रीडा महोत्सवात खारेपाटण केंद्र शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांनी खालील स्पर्धामध्ये यश संपादन केले.
लांब उडी मोठा गट – (मुलगे/मुली) आयुष गुरव (द्वितीय) कु.तन्वी उपाध्ये (द्वितीय)
लांब उडी लहान गट – (मुलगे) अथर्व लाड
उंच उडी लहान गट – (मुलगे/मुली) अथर्व लाड(प्रथम)जय धामापूरकर (द्वितीय),कु.वेदिका चौरे (द्वितीय)
उंच उडी मोठा गट – (मुलगे/मुली) तन्मय जेधे(प्रथम),कु.श्रिया राऊत (प्रथम) कु.सानवी घाग (द्वितीय)
गोळा फेक मोठा गट – (मुलगे/मुली) सर्वेश नाडगौडा (द्वितीय) कु. राहत इरफान सारंग (द्वितीय)
याबरोबरच लहान गट कबड्डी (मुलगी) – प्रथम क्रमांक व लहान गट कबड्डी (मुलगे)- प्रथम क्रमांक,तर मोठा गट कबड्डी (मुलगे) – प्रथम क्रमांक,मोठा गट कबड्डी (मुली)प्रथम क्रमांक तसेच लहान गट खो – खो (मुली) प्रथम क्रमांक व लहान गट खो – खो (मुलगे) प्रथम क्रमांक तर मोठा गट खो – खो (मुली)- प्रथम क्रमांक,मोठा गट खो – खो (मुलगे) – प्रथम क्रमांक.या व्यतिरिक्त ज्ञानी मि होणार या स्पर्धेत मोठा गट – प्रथम क्रमांक तर लहान गट – द्वितीय क्रमांक तर समूह नृत्य स्पर्धेत लहान व मोठा य दोन्ही गटांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.व समूह गान लहान गटाने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या सर्व विद्यार्थ्यांची पुढील होणाऱ्या प्रभाग स्तरीय स्पर्धेकरीता निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी उपाध्यक्ष माजी अध्यक्ष श्री संतोष पाटणकर सौ गौरी शिंदे उपाध्यक्ष श्री अण्णा तेली, माता पालक संघाच्या उपाध्यक्ष सौ प्रियंका गुरव,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री मंगेश ब्रम्हदंडे शाळेचे उच्च श्रेणी केंद्र मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.