आंबा कलम बागेचे नुकसान
देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे बाजारपेठ येथील आझाद नगर टापू वर अचानक लागलेल्या आगे ची बातमी नगरपंचायत कार्यालयात समजतात अग्निशमनबंबासह नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी आगीमुळे गवत व आंबा कलमे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने मोठे नुकसान झाले सदरची घटना दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार आझाद नगर येथील आंबा कलम बागेत आग लागल्याची माहिती नगरसेवक तेजस मामघडी यांनी नगरपंचायतीमध्ये कळवतात अग्निशमनबंबासह नगरपंचायतीचे कर्मचारी मकरंद घाडी,नील बांदिवडेकर,कुंदन घाडी, किशोर सावंत यांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असतानाच माजी नगरसेवक नीरज घाडी, रवींद्र ठुकरुल,चंदन मामघाड़ी तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असले तरी आंबा कलमांचे मोठे नुकसान झाले आहे.












