संत रविदास यांच्या स्मृतीस कणकवली तालुका चर्मकार समाजाच्या वतीने अभिवादन
कणकवली (प्रतिनिधी) : समता आणि बंधुतेचा संदेश देत अंधश्रद्धेच्या चा बिमोड करणारा संदेश देत पूरोगामी समाज घडवण्याचे महत्कार्य मध्ययुगीन काळात संत रविदास यांनी केले होते. चर्मकार समाजाचे आराध्यदैवत संत रविदास यांनी सर्व मानवजातीला समानतेचा संदेश दिला. संत रविदास यांचे सद्विचार आजही समाजाला दिशादायक असल्याचे उदगार महानंदा चव्हाण यांनी काढले.संत रविदास यांच्या महापरिनिर्वाण दिनी 19 डिसेंबर रोजी संत रविदास यांच्या प्रतिमेला सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली च्या वतीने चंदू भोसले यांच्या निवासस्थानी पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी संत रविदास यांनी समस्त समाजाच्या उद्धारासाठी दिलेल्या योगदानाला उजाळा देण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष महानंद चव्हाण सचिव अविनाश चव्हाण,कार्याध्यक्ष महेंद्र चव्हाण, प्रविण म्हापणकर, चंद्रकांत भोसले, केशव पावसकर, अशोक नारकर, समिर करंजेकर, राजु जाधव, प्रकाश वाघेरकर, बाळा करंजेकर, मंगेश साळसकर आदी उपस्थित होते.












