देवगड (प्रतिनिधी) : शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी योजना 2023 अंतर्गत, देवगड तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत भात खरेदीचा शुभारंभ जिल्हा बँक संचालक ॲड.प्रकाश बोडस यांचे हस्ते करण्यात आला.यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲड.अजित गोगटे,उपाध्यक्ष रवींद्र तिर्लोटकर,संचालक संतोष किंंजवडेकर,राजेंद्र शेट्ये,चंद्रकांत पाळेकर,संतोष फाटक,सुभाष नार्वेकर,शैलेंद्र जाधव,रेश्मा जोशी,संपदा बोंडाळे,व्यवस्थापक कौस्तुभ जामसंडेकर तसेच उद्योजक समीर पेडणेकर, संघाचे भात खरेदी प्रमुख राजेश सावंत व तालुक्यातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
भात खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर असून,जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपली नोंदणी करावी असे आवाहन खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲड.अजित गोगटे यांनी केले.