लाखो रुपयांची उधारी मागितल्याच्या रागातून मारहाण, वागदे गावातील घटना

किशोर घाडीगांवकर सह मंगेश घाडीगांवकर वर गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : सेन्टरिंग कामासाठी भाड्याने घेतलेल्या लोखंडी प्लेटचे थकीत भाडे 1 लाख 7 हजार रुपये मागितले म्हणून वागदे मांगरवाडी येथील राजेंद्र प्रभाकर परब याना वागदे ( देऊळवाडी ) गावातील मंगेश घाडीगांवकर व किशोर घाडीगांवकर यांनी हाताच्या थापटाने मारहाण करून ओठाचा उजव्या बाजूस कडकडून चावा घेत जखमी केले. तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या अनंत गोसावी याला लाकडी दांड्याने मारहाण केल्याबद्दल राजेंद्र परब यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी किशोर घाडीगांवकर व मंगेश घाडीगावकर विरोधात आयपीसी 325, 323, 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 18 डिसेंबर रोजी रात्री घडली. जखमी राजेंद्र परब यांच्यावर गोवा बांबूळी येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. अधिक तपास एपीआय मनोज पाटील करत आहेत.

error: Content is protected !!