देवगड (प्रतिनिधी): जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स या दुकानाला मध्यरात्री बाराच्या बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तसेच पटेल बंधूंनी घटना स्थळी धाव घेतली.आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले परंतु आगीने रुद्ररूप धारण केल्यामुळे विनोद पाटेल यांच्या दुकानातील सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र आगीचे कारण नेमके अद्यापही समजू शकले नाही. मिळालेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे आठ वाजण्याच्या सुमारास आपले दुकान बंद करून घरी गेले. रात्री सव्वा बाराच्या सुमारास भगवती ट्रेडर्स दुकानाच्या वरच्या मजल्यावरील रहिवाशी यांनी दुकानांमध्ये आग लागल्याची माहिती दिली. मात्र दुकानातील ग्रीलमध्ये पाण्याच्या टाक्या कलर सामान असल्यामुळे आत मध्ये जाणे शक्य होत नव्हते.घटनास्थळी पटेल बंधू येईपर्यंत आगीने औद्ररूप धारण केले होते. घटनेची माहिती मिळताच नगरपंचायत प्रशासनाचे कर्मचारी अग्निशामक बंबासहित घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले . परंतु विनोद पटेल यांच्या हार्डवेअर मध्ये असलेल्या बऱ्याच वस्तूंनी पेट घेतल्यामुळे पटेल यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच नगरसेवक तसेच स्थानिक व्यापारी पटेल बंधू तसेच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.