सिंधुदुर्गातील तमाम सुतार समाज बांधवांनी उपस्थित रहावे – समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश मेस्री यांचे आवाहन
आचरा (प्रतिनिधी): पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील ३३२, प्रदक्षिणा रोड, फुटवाले धर्मशाळा येथे सुतार समाजाचा महामेळावा २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास तथा धुळे जिल्हा पालकमंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, उद्योग मंत्री उदय सामंत यांचेसह समाजाचे आ. संजय रायमुलकर उपस्थित राहणार आहेत. या महामेळाव्यास सिंधुदुर्गातील प्रत्येक घराघरातून सुतार समाज बंधू-भगिनींनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मी सुतार समाज सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय आनंद मेस्री, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समिती अध्यक्ष प्रकाश दिनकर मेस्री, सचिव राजु मेस्री यांनी केले आहे.