श्री.पावणादेवी मंडळ सोनाळीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
वैभववाडी (प्रतिनिधी): शनिवार दि.२३ डिसेंबर रोजी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान वैभववाडी व श्री.पावणादेवी मंडळ सोनाळी यांच्या वतीने ग्रामपंचायत येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे, तर बुधवार दि. २७ डिसेंबर ते शनिवार दि.३० डिसेंबर या कालावधीत क्रिकेट स्पर्धा, गावातील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, सत्यनारायण पूजा, महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ, जेष्ठ नागरिक व मान्यवरांचा सत्कार, पारितोषिक वितरणार समारंभ, शिवाय कोकणी संस्कृतीवर आधारित कोकणचा साज संगमेश्र्वरी बाज अशा बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोनाळी गावातील विद्यार्थी, ग्रामस्थ व युवकांनी मंडळाच्या वतीने आयोजित सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.