कुडाळ एमआयडीसी येथे उद्या उद्योग माहिती अधिवेशन

ओरोस (प्रतिनिधी) : महायुती फाउंडेशन, सावंतवाडी आणि एम.आय.डी.सी. असोसिएशन, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने असोसिएशन कार्यालयामध्ये माहिती अधिवेशनच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून हा कार्यक्रम 15 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 3 वा. संपन्न होणार आहे.

महायुथ फाउंडेशनच्या या कार्यक्रमात रोजगार, स्वयंरोजगार आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना संदर्भात संपूर्ण माहिती दिली जाणार आहे . याबाबतचे मार्गदर्शन करण्यासाठी अभिनव योजना सिस्टीमचे विशेष अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी वेगवेगळ्या राज्य सरकारच्या योजना बाबत माहिती देऊन त्या योजनेत कसा सहभागी होऊन आपल्याला लाभ कसा घेता येईल, यावर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी कुडाळ व इतर तालुक्यातील सर्व उद्योग व्यवसायिकांनी अधिवेशनात आवर्जून उपस्थित रहावे व या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा आणि या संदर्भातील आपल्या काही शंका असतील तर विशेष अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने त्या शंकांचे निरसन करावे.

सर्व उद्योग व्यवसायिकांनी एम.आय.डी.सी. असोसिएशनच्या कार्यालयामध्ये दुपारी 3 वा. वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमास सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण विभाग महायुथ प्रमुख संजय नाईक यांनी व फाउंडेशन सावंतवाडी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9921927168 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!