आचरा (प्रतिनिधी) : कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल (मुली) निवड चाचणी स्पर्धा आझाद विद्यालय कासेगाव, सांगली येथे २१ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न झाल्या. सदर निवड चाचणी मध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग जिल्हयातील खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यावेळी सर्व खेळाडूंमधून १२ खेळाडूंचा महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला.
निवड झालेल्या महाराष्ट्र संघामधे जनता विद्या मंदीर त्रिंबकची विद्यार्थिनी कुमारी शर्वरी प्रशांत परब हीची निवड करण्यात आली.निवड झालेल्या सर्व खेळाडूंचा एक दिवशीय कॅम्प सांगली येथेच घेण्यात आला. सदर संघ २३ डिसेंबरात २०२३ रोजी विर्ले पार्ले, मुंबई येथे संपन्न होणाऱ्या राज्य स्पर्धा खेळणार आहे. सदर विद्यार्थिनीचे माध्यमिक शिक्षण समितीचे संस्थाध्यक्ष सुरेंद्र(अन्ना) सकपाळ, कार्यवाह अरविंद घाडी, उपाध्यक्ष अशोक बागवे, सर्व संचालक मंडळ, जनता विद्या मंदीर त्रिंबकचे मुख्याध्यापक प्रविण घाडीगांवकर, क्रिडा शिक्षक महेंद्र वारंग व सर्व शिक्षक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आहे. या यशा बद्दल कुमारी शर्वरी परब हीचे सर्वत्र कौतुक होत आहे.