ग्राहक पंचायत सिंधुदुर्ग आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धा
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवलीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत माध्यमिक गटात आर्या अरुण नाईकसाटम, (विद्यामंदिर माध्य.प्रशाला कणकवली),कनिष्ठ महाविद्यालय गटात रिद्धी जयेंद्र पाळेकर (ज्युनि. कॉलेज कासार्डे) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.दोन गटात आयोजित या निबंध स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे माध्यमिक गट (इ.८ वी ते १० वी) विषय सजग विद्यार्थी आणि ग्राहक चळवळ, ग्राहक चळवळ आणि मी . द्वितीय आदित्य अमोल खानोलकर (विद्यामंदिर माध्य. प्रशाला कणकवली), तृतीय धनश्री चंद्रकांत कानकेकर (वारगावं हायस्कूल).उतेजनार्थ श्रेया विश्वनाथ घाडी(कासार्डे हायस्कूल) कनिष्ठ महाविद्यालय गट-विषय ग्राहकतीर्थ बिंधूमाधव जोशी आणि ग्राहक चळवळ, ऑनलाईन खरेदीचे फायदे तोटे.
द्वितीय श्रद्धा सदाशिव पाटील (कणकवली कॉलेज), तृतीय प्रितिका सदानंद चौगुले (ज्युनि. कॉलेज कासार्डे) उतेजनार्थ ऋषीकेश दिनेश मेस्त्री (ज्युनि.कॉलेज तळेरे)यांनी मिळविले आहेत. मा.तहसीलदार दीक्षांत देशपांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम तहसीलर कार्यालय कणकवली यांच्या वतीने तहसील कार्यलय कणकवली येथे २७ डिसेंबर रोजी दुपारी ३.०० वा. होणार आहे. या कार्यक्रमात प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेते व उतेजनार्थ अनुक्रमे रोख रु.५०१/-, ३०१/- , २०१/- व १०१/- प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याची सर्व विजेत्या स्पर्धकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन संस्थेचे तालुका अध्यक्ष श्रद्धा कदम, उपाध्यक्ष गीतांजली कामत, संघटक चंद्रकांत चव्हाण व सचिव सौ.पूजा सावंत,सह. सचिव विनायक पाताडे यांनी केले आहे.