करुळ येथे २५ डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर

ग्रामपंचायत करूळ व वालावलकर रुग्णालय डेरवण यांचे आयोजन

वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत करूळ व बी.के.एल. वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. २५ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला डेरवण रुग्णालयातील तज्ञ डॉक्टर उपस्थित राहणार आहेत. हे शिबिर ग्रामपंचायत करूळ च्या सभागृहात पार पडणार आहे. तरी या शिबिराचा गावातील नागरिकांनी व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच नरेंद्र कोलते, उपसरपंच सचिन कोलते यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ग्रामसेवक शशिकांत गुरव – ८८०५८७००७६.

error: Content is protected !!