कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजितकै.उमा महेेश काणेकर स्मृती विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा..

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांची चित्रशैली विकसित व्हावी आणि रंगरेषांच्या माध्यमातून त्यांची अभिव्यक्ती तसेच सृजनशीलता अधिक समृद्ध व्हावी या उद्देशाने कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित कै.उमा काणेकर स्मृतिदिनाचे औचित्य साधून विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे शनिवार दिनांक ३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. खालील गटात विषयनिहाय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

गट पहिला (पाचवी ते सहावी)
विषय: १)आईस्क्रीम विक्रेता
२) जादूगार

गट दुसरा (सातवी ते आठवी)
विषय: १)क्रिकेट
२)संगीत कार्यक्रम

गट तिसरा (नववी ते दहावी)
विषय: १)शाळेतील दृश्य
२)देवळातील दृश्य

गट चौथा (अकरावी ते बारावी)
विषय: १)गावची जत्रा
२)आठवडा बाजार

खुला गट
विषय: १)सोशल मिडियामध्ये गुरफटलेली तरुणाई
२)प्राणी संग्रहालय

स्पर्धेचे नियम आणि अटी :
१)स्पर्धकांना ट्रस्ट मार्फत कागद पुरवला जाईल.रंग, ब्रश आणि इतर साहित्य स्पर्धकांनी स्वतः आणायचे आहेत.
२)प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ दोन क्रमांक काढून त्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
३)सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
४)परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
५)स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ जानेवारी महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
अधिक माहितीसाठी
महेश काणेकर-९४२२९६७५४७
राकेश काणेकर-८६९८८५२८१५

सर्व स्पर्धकांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन ट्रस्टच्या कलाविषयक उपक्रमाला सहकार्य करावे असे आवाहन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक, चित्रकार महेश काणेकर यांनी केले आहे .

error: Content is protected !!