जि.प.शाळा कलमठ गावडेवाडी येथे सानेगुरुजी जयंती उत्साहात साजरी
कणकवली (प्रतिनिधी) : पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच पूज्य सानेगुरूजींच्या १२४ व्या जयंती निमित्त जि.प.प्राथमिक शाळा कलमठ गावडेवाडी शाळेत २४ डिसेंबर रोजी विशेष कथामालेचे आयोजन करण्यात आले हाेते.विद्यार्थ्यांबरोबर पालकही उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शुभांगी पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.कणकवली केंद्रप्रमुख के.एम.पवार,शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक, पालक शिक्षक संघाचे सदस्य यावेळी उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे सर्व माता या उपक्रमाला उपस्थित होत्या हे विशेष. “खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ” हि साने गुरुजींची शिकवण.त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी आंगणे यांनी साने गुरुजी,श्यामची आई या पुस्तकाबद्दल,आई बद्दल आणि पूज्य साने गुरुजींबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
“बलसागर भारत होवो । विश्वात शोभुनी राहो।।” या गुरुजींच्या गीताने कथाकथनाला सुरुवात झाली.
प्रथम श्रीम. शितल मोहन गोवेकर, उपशिक्षिका यांनी ‘मुकी फुले’ ही कथा मुलांना सांगितली. मुख्या.रश्मी रामचंद्र आंगणे यांनी ‘श्रीखंडाच्या वड्या’ ही कथा सादर केली. सौ शुभांगी पवार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. कणकवली केंद्राचे केंद्रप्रमुख सन्मा. श्री. के. एम. पवार यांनीही विद्यार्थ्यांना श्यामची आई, तिचे संस्कार याबद्दल सखोल अशी माहिती दिली. तसेच उपस्थित सर्व माता पालकानी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर कथाकथन स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यातील निवेदक पियुष पवार – शिवाजी महाराज, शिवतेज पाटील – हावरा ससा ,चारुल मोरे-ससा आणि कासव, गौरांग खाजनवाडकर-ससा आणि मगर, अनुग्रह शिंगाडे-जादुई मडके,पूर्वा चव्हाण -जादुई घंटा ,प्रेम पवार, लाकुडतोड्या, हर्ष पवार-अट्टल आणि गट्टू, विघ्नेश बांदिवडेकर -सिंह आणि बैल,आरोही जाधव-बेपर्वा नाकतोडा, साधना लोधी – जादुई चेटकीण, हेमंत गावकर – कोल्हीणबाई .या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ गौरी गवळी ,अंगणवाडी मदतनीस यांनी काम पाहिले .
त्यानंतर मुलांना खाऊ देण्यात आला. हा खाऊ आमचे पालक श्री विशाल जाधव आणि श्री डब्लू लोधी यांच्यामार्फत दिला. तसेच शाळेच्या वतीने नागपूरची स्पेशल बर्फी मुलांना वाटली.”जग हे सारे सुंदर आहे आपण सुंदर होऊया ,आपण सुंदर होऊया” या सुंदर गाण्याने कथामालेची सांगता झाली.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आरोही विशाल जाधव हिने केले.