भाजपा वेंगुर्ले , खर्डेकर महाविद्याल व आनंदयात्री यांच्यावतीने ” काव्यांजली ” चे आयोजन
वेंगुर्ले (प्रतिनिधी) : भारताचे भूतपूर्व पंतप्रधान कवी मनाचे व्यक्तिमत्व अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भाजपा वेंगुर्ला व आनंदयात्री वाङ्मय मंडळ, वेंगुर्ला व बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने वेंगुर्ला परबवाडा – कणकेवाडी येथे प्रतिवर्षीप्रमाणे एका कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
या कवी संमेलनाला अटलजींच्या हिंदी रचना व त्यांचे मराठी भावानुवाद बॅ. खर्डेकर महाविद्यालयातील प्रा.सौ.देशपांडे, प्रा.सौ.सुनीता जाधव, प्रा.नंदगिरी सर, डाॅ.सौ. पूजा कर्पे, शिक्षिका सौ. प्राजक्ता आपटे, मा.नगरसेविका सौ. श्रेया मयेकर, जि.उपाध्यक्षा अँड. सौ. सुषमा खानोलकर,आनंदयात्रीचे अजित राऊळ सर, नगरवाचनालयाचे कैवल्य पवार गुरुजी, पाटकर हायस्कूलचे महेश बोवलेकर सर, अँँड.चैतन्य दळवी, माजी प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर सर, आनंदयात्री च्या फाल्गुनी नार्वेकर, सांस्कृतिक आघाडीचे शैलेश जामदार आणि खर्डेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी कु.प्रीती वाडकर, मयुरी राऊळ, दिव्या गावडे, दिया वांगणकर, दिव्या मांजरेकर इत्यादींच्या कविता वाचनाने अटलजींना त्यांच्या जन्मदिनी भावपूर्ण अभिवादन केले.
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई यांच्या प्रस्ताविकांने सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे निवेदन व सूत्रसंचालन अजित राऊळ सर यांनी केले.राष्ट्रीय सेवा योजना कॅम्प , कणकेवाडी परबवाडा वेंगुर्ला येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात अटलजींच्या प्रतीमेस प्राचार्य एम.बी चौगुले सर व परबवाडा सरपंचा सौ.शमिका बांदेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली .यावेळी परबवाडा उपसरपंच विष्णु उर्फ पपु परब, राष्ट्रीय सेवा योजनेचे चुक्केवाड सर, भाजपाचे साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, प्रकाश रेगे, हेमंत गावडे, संतोष गावडे, स्वरा देसाई, सुधीर गावडे, डॉ. सचिन परुळकर, सर्पमित्र महेश राऊळ, युवा मोर्चाचे मारुती दोडशानट्टी तसेच खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.