५० रक्तदात्यांचा रक्तदान शिबिरात सहभाग
वैभववाडी (प्रतिनिधी) : प.पु.प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट, नाधवडे (गावठण) व त्रिमूर्ती मित्र मंडळ मुंबई आणि दत्त माऊली महिला मंडळ मुंबई यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्या निमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्या बरोबरच या वर्षी सामाजिक बांधिलकी जपत मंडळाच्या वतीने रविवार दि.२४-१२-२०२३ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला.ओराेस ब्लड बँक कर्मचारी वर्ग यांनी शिबिर स्थळी उपस्थीत राहून सदर शिबिर प्रसंगी सहकार्य केले.












