चौके (अमोल गोसावी) : ग्लोबल फाऊंडेशन मुंबई तर्फे वेताळ बांबर्डे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना १० दिवसांचे संगणक प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. या मोफत प्रशिक्षणाचा शुभारंभ शुक्रवार २२ डिसेंबर रोजी ग्लोबल फाउंडेशन मुंबईच्या व्यवस्थापिकामेघना भिडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कुडाळ शाखेचे डायरेक्टर प्रसाद परब,ग्लोबल फाउंडेशनचे आरोग्य उपक्रम प्रमुख लक्ष्मण देसाई,संगणक प्रशिक्षक स्वप्नील नाईक,सहायक उमेश गावडे, वेताळबांबर्डे उपसरपंच प्रदीप गावडे, शाळां व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सखाराम सावंत,सदस्य सजूराम नाईक,माजी अध्यक्ष डॉ.जयसिंग घाडी तसेच प्रशाळेचे मुख्यध्यापक शंकर गोसावी.पदवीधर शिक्षक ठाकूर व पालक उपस्थित होते.यावेळी कुमारी. सुनीता लक्ष्मण सामंत व निधी अरुण घाडी या दोन विदर्थिनींना प्रत्येकी 3600/- रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली.
ग्लोबल फाऊंडेशन तर्फे वेताळ बांबर्डे शाळेतील विद्यार्थ्यांना १० दिवसांचे मोफत संगणक प्रशिक्षण












