स्पर्धेत सहभागी होण्याचे करण्यात आले आहे आवाहन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय खुली लघुचित्रपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे- या स्पर्धेत सहभागी स्पर्धकानी लघुचित्रपटाची निर्मिती स्वता केलेली असावी.
२. पटकथा, दृश्य, संकल्पना, संवाद, पाश्वसंगित, गीत, चित्रिकरण स्वता केलेले असावे.
३. अगोदर प्रकाशीत झालेले किंवा व्यक्ती, संस्था, कंपनी, शासकिय विभाग त्यांनी त्याच्या कामाकरीता
तयार केलेले सादर करण्यात येऊ नयेत.
४. लघुचित्रपट निर्मिती करीता वापरण्यात आलेले साहित्य प्रोफेशनल दर्जाचे व उत्तम असावे,
५. लघुचित्रपट निर्मिती करीता वापर हा प्रमाण मराठी व कोणाच्याही भावना व अस्मिता दुखावनारे नसावे.
६. या स्पर्धेकरीता जमा करण्यात आलेले लघुचित्रपट स्पर्धेसाठी पात्र व निवडिचे अधिकार प्रकल्प
संचालक, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्याकडे असतील. लघुचित्रपटाचे विषय १. पाण्याचे शाश्वत स्रोत २. पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती ३. जल संवर्धन ४. हर घर जल घोषित गाव ५. जल जीवन मिशन यशोगाथा ६. विविध योजनांचे कृती संगम
८. एक स्पर्धक एकच लघुचित्रपट सादर करु शकतो.
९. या स्पर्धेकरीता ३ ते ५ मिनिट कालावधीचा लघुचित्रपट तयार करावयाचा आहे.
१०. कॉपी राईट उल्लघन होत नसलेबाबत स्वयंघोषणापत्र स्पर्धकांनी द्यावेत,
११. स्पर्धेकरीता बक्षिस रक्कम
. प्रथम क्रमांक- ३१०००/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व्दितिय क्रमांक-२१०००/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतिय क्रमांक – ११०००/- व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,
१२. जल जिवन मिशन अंतर्गत जिल्हास्तरीय लघुचित्रपट स्पर्धेकरीता स्पर्धकांनी आपले लघुचित्रपट दिनांक १५ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद येथे जमा करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.