संदीपभाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद….!

चिंदर सेवा संघ आणि जिल्हा रक्तपेढी यांचे संयुक्त आयोजन

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर भगवती माऊली यात्रेचे औचित्य साधून जिल्हा रक्तपेढी सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने, चिंदर सेवा संघ आयोजित संदीपभाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शिबिराचे उद्घाटन अध्यक्ष प्रकाश मेस्री, भाई तावडे, शेखर पालकर,जिल्हा रक्तपेढी डाॅ.अभिजीत इगे, प्रांजली परब यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन झाला.

शिबिरात रणजित दत्तदास,संतोष दिगंबर अपराज,अर्चित अरविंद लेले,आशिष कोरगांवकर,भूषण विजय रेवडेकर,साईल सहदेव सावंत,सर्वेश अपराज, प्रथमेश अपराज,दत्तात्रय जाधव,गोविंद गांवकर,निशिकांत कमले,हेमंत वायंगणकर,शंकर पालकर,विश्वनाथ दळवी,रविंद्र पवार, दिपक भास्कर पारकर,निशांत पारकर, वैभव मनोज सावंत, तुषार विजय सावंत, रावजी गोविंद सावंत, समिर पालकर, प्रणित काणेकर, डाँ विवेक घाडगे,ओमकार आचरेकर, रत्नराज नारिग्रेंकर,रोहन पाटणकर या 26 दात्यांनी पुण्यदान केले.तर निलेश गांवकर, विराज सावंत,दत्तात्रय सावंत, अंकित वर्देकर, अमर थापा, सहदेव सावंत यांनी आपला सहभाग दर्शविला.

यावेळी उपसरपंच दिपक सुर्वे, चिंदर सेवा संघाचे कार्यवाह सिध्देश गोलतकर,पोलिस पाटील दिनेश पाताडे, खजिनदार गणेश गोगटे, सहखजिनदार आशिष कोरगांवकर,विशाल गोलतकर,राेहन वराडकर,शंकर पालकर,निशांत पारकर,मयुरी शिंदे,डोंगरे,गांवकर, निरुखेकर, विवेक परब आदी उपस्थिती होते.

error: Content is protected !!