रिक्षाचालक ठरले लुटारु ; कणकवलीतल्या घटनेने प्रामाणिक रिक्षा व्यावसायिकांत खळबळ

दोन्ही आरोपींना कणकवली पोलिसांनी केली अटक

कणकवली (प्रतिनिधी) : भाडयाने रिक्षात बसलेल्या इसमाचे अपहरण करून त्याला मारहाण करत रोख रक्कमेसह मोबाईल ची लूट करण्याचा प्रकार कणकवलीत रिक्षा चालक व त्याच्या सहकारी आरोपीकडून घडल्याने प्रामाणिक पणे रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा तपास पीआय अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल हाडळ , राजेंद्र गाडेकर, शरद देठे, वाहतूक पोलीस हवालदार विनोद चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी केला. कणकवली पोलीस ठाण्यात धीरेंद्र कुमार श्रीकांत यादव ( रा. उत्तरप्रदेश ) याने दिलेल्या फिर्यादीनुसार धिरेंद्र कुमार 25 डिसेंम्बर 2023 रोजी रात्री साडेनऊ वाजता मोटरसायकलने कणकवलीत आला होता. कणकवली शहरातील पटवर्धन चौकात त्याने रेल्वे स्टेशनजवळील समर्थनगरकडे जाण्यासाठी रिक्षा क्र. MH 07 – AH – 2949 मध्ये बसला. त्यानंतर रिक्षचालक अल्ताफ अत्तर व सहकारी आरोपी सुहास घोगळे यांनी धीरेंद्रकुमार याला मारहाण करून त्याला गोव्याच्या दिशेने घेऊन गेले.गोवा बॉर्डरपर्यंत नेऊन पून्हा दुसऱ्या दिवशी कुडाळात आणले व त्याच्याकडील एटीएम कार्ड घेत पासवर्ड घेऊन 18 हजार रुपये एटीएम मधून काढून घेतले , धिरेंद्रकुमार चा 20 हजार चा मोबाईल हिसकावून घेत त्याला कुडाळ एसटी बस स्टँड येथे सोडून दिले. त्यानंतर धिरेंद्रकुमार याने कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. य गुन्ह्यात आरोपी अल्ताफ अत्तर आणि सुहास घोगळे याला कणकवली पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पीएसआय राजेंद्र गाडेकर करत आहेत.

error: Content is protected !!