कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघ पदाधिकाऱ्यांची बोर्डवे आश्रमशाळेस सदिच्छा भेट

विद्यार्थ्यांशी संवाद साधत दिली १० हजार रुपये आर्थिक मदत

चौके ( अमोल गोसावी ) : कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघ अध्यक्ष गणेश गोसावी आणि काही पदाधिकाऱ्यांनी ” महासंघ आपल्या दारी ” या उपक्रमांतर्गत नुकतीच कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील नाथपंथी गोसावी समाज आश्रमशाळेस सदिच्छा भेट दिली. यावेळी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्यात रममाण झाले. तसेच गेली कित्येक वर्षे सक्षमपणे आश्रमशाळेची धूरा सांभाळणाऱ्या श्रीम.ऊर्मिला गोसावी यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचीही भेट घेत शुभेच्छा दिल्या. यावेळी आश्रमशाळेतील मुलांसाठी आपणही काहीतरी करायला हवे या जाणिवेतून उपस्थित पदाधिकाऱ्यांनी लगेचच १० हजार रुपये देणगी गोळा करून आश्रमशाळेस दिली.

यावेळी नाथसमाज ऐक्यवर्धक मंडळ मुंबईचे अध्यक्ष तथा कोकण विभाग नाथपंथी गोसावी महासंघाचे कार्याध्यक्ष श्री. विनोद गोसावी , महासंघ अध्यक्ष गणेश गोसावी, यशवंत काणेकर , शंकर कांबळ, राजेंद्र खांबल कामिनी गोसावी, संगिता खांबल, अनिता बामणे, अमृता राणे, पांडुरंग लाखे, दशरथ जांभळे, पांडुरंग गोसावी, जयेंद्र जांभळे , वामन हळदे , आश्रमशाळा संचालिका श्रीम. ऊर्मिला गोसावी , नाथपंथी गोसावी समाज सिंधुदुर्ग चे सचिव सदानंद गोसावी ,आदी जण उपस्थित होते.

error: Content is protected !!