ऑनलाईन जुगार कारवाईत ठेवणार सातत्य – अमित यादव
कणकवली (प्रतिनिधी) : ऑनलाईन जुगारावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिली कारवाई केल्याबद्दल कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांचा महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन कणकवली शहर व तालुका शिवसेना उबाठा च्या वतीने सत्कार करण्यात आला. ऑनलाईन जुगारामुळे होणारे दुष्परिणाम हे कुटुंब आणि समाज बिघडविणारे आहेत. ऑनलाईन जुगारावर अद्याप सिंधुदुर्ग जिल्ह्यात कारवाई झालेली नव्हती. कणकवली पोलीस निरीक्षक यादव यांनी ऑनलाईन जुगारावर गुन्हा दाखल केला.याबद्दल कणकवली शहर व तालूका शिवसेना उबाठा च्या वतीने अमित यादव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक यादव म्हणाले की वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्यात पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. कायद्याच्या कक्षेत हा गुन्हा साबीत होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून यापुढे ऑनलाईन जुगारावरील कारवाईत सातत्य असणार आहे.यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले,युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर, निसार शेख, भालचंद्र दळवी, वैभव मालंडकर, तेजस राणे, विलास गुडेकर, अविनाश सावंत, सचिन राणे, महिला उपशहरप्रमुख दिव्या साळगावकर, महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर, महिला उपतालुका संघटक संजना कोलते, माधवी दळवी आदी उपस्थित होते.