जुगार खेळत असताना पकडले होते अनेकांना रंगेहाथ ; पोलीस कारवाईवेळी तो माजी नगरसेवकही उपस्थित असल्याची चर्चा
कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी पोलिसांनी दाजीपूर ओलवन येथे 31 डिसेंबर रोजी जुगारावर टाकलेल्या छाप्यावेळी देवगड नगरपंचायत चा माजी नगरसेवक उपस्थित असल्याचा अजब “योगायोग” जुळून आल्याचे चर्चेत आहे. तसेच ज्या होम स्टे कम रिसॉर्ट वर पोलिसांनी छापा मारून जुगार खेळताना रंगेहाथ पकडले ते रिसॉर्ट याच माजी नगरसेवकाच्या चिरंजीवाने भाड्याने चालविण्यास घेतल्याचीही चर्चा आहे.दाजीपूर सारख्या थंड हवेच्या पर्यटन ठिकाणी होम स्टेच्या माध्यमातून व्यवसाय करता करता जुगार खेळण्यास मुभा देत स्वतःची “चांदी” करणे या माजी नगरसेवकास स्वतःच्या चिरंजीवाचे नाव ऑन रेकॉर्ड न येण्यासाठी कसरत करावी लागली असून असून लेणे के देने पडल्याची ही खमंग चर्चा सुरू आहे.











