सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली शहरात ऑनलाईन जुगारावर कारवाई केल्यानंतर आता पोलिसांनी अवैध व्हीडिओ गेम पार्लरकडे आपला मोर्चा वळवला आहे. केवळ एका व्हीडिओ गेम पार्लर चे लायसन्स असूनही जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्हीडिओ गेम पार्लर सेटअप उभारून वरकमाई करत शासनाची फसवणूक करणारे अनेक महाभाग आहेत. अशा ठकवेगिरी करणाऱ्या व्हीडिओ गेम पार्लर चालकांचे लायसन्स व अन्य कागदपत्रांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत असून त्याबाबत ची कागदपत्रे मागवण्यात आली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे आता अशा व्हीडिओ गेम पार्लर वाल्यांच्या पोटात गोळा उठला आहे.