ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मंत्रालय असावे – भालचंद्र मराठे
खारेपाटण (प्रतिनिधी): संपूर्ण भारत देशात एकूण २८ कोटी इतके जेष्ठ नागरिक असून त्यांच्या सोयी सुविधांसाठी केंद्र सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे अशी मागणी केली असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भालचंद्र मराठे यांनी खारेपाटण येथे आयोजित करण्यात आलेल्या जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या १७ व्या वर्धापन दिन व जेष्ठ नागरिक मेळाव्यात मार्गदर्शन करताना सांगितले. खारेपाटण शिवाजी पेठ येथे खारेपाटण जेष्ठ नागरिक सेवा संघाचा मेळावा तसेच वर्धापन दीन नुकताच खारेपाटण गावच्या सरपंच प्राची ईसवलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.या कार्यक्रमाला माजी जिल्हा अध्यक्ष दादा कुडतरकर, तालुका अध्यक्ष मनोहर पालयेकर खारेपाटण ग्रा.पं.सदस्य सुधाकर ढेकणे,खारेपाटण जेष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अनंत पाटणकर,जेष्ठ कार्यकर्ते,सुरेश गोडवे,अनंत गांधी, जेष्ठ व्यापारी मधू आण्णा देवस्थळी, पत्रकार संतोष पाटणकर, नंदू कोरगावकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने “गौरव श्रेष्ठत्वाचा” अर्थात सहस्त्र चंद्रदर्शन जेष्ठ नागरिक गौरव निमित जागतिक जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ७५ वर्ष पूर्ण करणाऱ्या खारेपाटण येथील श्री गोविंद गंगाराम राऊत व बापू डोर्ले यांचा भेटवस्तू देऊन तर वयाची ८० वर्षे पूर्ण करणाऱ्या श्रीम.मंगला भास्कर देवस्थळी,अनंत भिकाजी पाटणकर,भिकाजी अनंत ढेकणे, गणपत लक्ष्मण चव्हाण,श्रीकृष्ण शेट्ये,लक्ष्मीबाई धालवलकर,मधुकर देवस्थळी,नलिनी गुनिजन,श्रीम. लक्ष्मी पेडणेकर,मंगला कोरगावकर या सर्व जेष्ठ नागरिकांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र,तसेच पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
याबरोबरच खारेपाटण जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने वर्धापन दीन निमीत्त सर्व जेष्ठ नागरिकांना बेडशिट चे वाटप देखील यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. नवीन शैशणिक धोरणानुसार नागरिक शास्त्राच्या पुस्तकात ज्येष्ठांनी कसे वागावे व जेष्ठ नागरिकांशी कुटुंबातील आणि समाजातील माणसांनी कसे वागावे. याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा अशी राज्य शासनाकडे आपण मागणी केली असल्याचे देखील यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री भालचंद्र मराठे यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा अध्यक्ष दादासाहेब कुडतरकर,तालुका अध्यक्ष मनोहर पालयेकर खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांनी देखील आपलीं मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्तविक सुरेंद्र कोरगावकर यांनी केले.तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री कुबल गुरुजी यांनी मानले.या कार्यक्रमाला खारेपाटण जेष्ठ नागरिक सेवा संघाचे सर्व जेष्ठ सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.