भाजपा वेंगुर्लेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

आचरा (प्रतिनिधी) : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वेंगुर्ले भाजपा तालुका कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन करताना जिल्हा उपाध्यक्ष अँड. सुषमा खानोलकर म्हणाली की, सावित्रीबाई फुलें यांनी तत्कालिन समाजाचा विरोध स्वीकारून स्त्री शिक्षणाची सुरवात केली. त्यांच्या या योगदाना मुळे असंख्य महिला शिक्षण घेऊ शकल्या. म्हणूनच त्यांची जयंती दिवस ” महिला मुक्ती दिन ” म्हणून साजरा केला जातो.

केंद्रातील मोदी सरकारने हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून ” बेटी बचाओ – बेटी पढाओ ” हे अभियान आणले, तसेच कोट्यावधी आया – बहिनींचा श्वास पिढ्यानपिढ्या गुदमवणारया चुली बंद करण्यासाठी ” उज्वला योजना ” आणली. तसेच दररोज सकाळी पायदळी तुडवली जाणारी स्त्रीसुलभ लज्जा सावरण्यासाठी घरोघरी शौचालय बांधण्याचा कार्यक्रम राबवला.

गेल्या ९ वर्षांत मोदी सरकार ने अंमलात आलेल्या विविध योजना, पाठींबा देणारे भरभक्कम कायदे ही परिघाबाहेरील महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठीची पायाभरणी आहे. ” सुकन्या समृद्धी ” सारख्या योजनेद्वारे मोदी सरकारने नारी शक्तीचे महत्व जाणवुन दिले आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, महीला मोर्चाच्या सौ.वृंदा गवंडळकर, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर,आकांक्षा परब, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, मच्छिमार नेते दादा केळुसकर, बाळु प्रभु , युवा मोर्चाचे मारुती दोडशानट्टी व कमलेश करंगुटकर, बुथप्रमुख शेखर काणेकर, शैलेश मयेकर, सिताराम मिशाळे, श्रीकृष्ण आकेरकर, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, मनवेल फर्नांडिस इत्यादी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!