शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांची जिल्हा नियोजन मंडळ सदस्यपदी निवड

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शिवसेना मालवण तालुकाप्रमुख राजा गावकर याची नियुक्ती करण्यात आली आहे.मंत्री दीपक केसरकर याच्या शिफारशीनुसार ही निवड झाली आहे.महाराष्ट्र शासन नियोजन विभागाचे पत्रही राजा गावकर यांना प्राप्त झाले आहे.

राजेंद्र उपेंद्र गावकर उर्फ राजा गावकर यांची जनसामान्यातलं एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. नावाप्रमाणेच राजा माणूस असलेले हे नेतृत्व त्यांचे प्राथमिक शिक्षण कुडाळ येथे झाले. कॉलेज शिक्षण त्यांनी सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण येथे पूर्ण केले. त्यानंतर मार्केटिंग क्षेत्रात मालवण तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांनी विविध शीतपेय कपनी सोबत त्यांनी काम केले. या व्यावसाय निमित्ताने मालवण तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या ओळखीच्या माध्यमातून तसेच सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या आवडीने ते राजकारणात प्रवेशकर्ते झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माध्यमातून त्यांनी राजकीय जीवनाची सुरवात केली. कै. दीपक मयेकर यांच्याच साथीने राजकारणात पदार्पण करत मालवण शहर प्रभाग 1 निरीक्षक म्हणून त्यांनी पक्ष संघटनेते यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. पुढे दीपकभाई केसरकर याच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आशीर्वादाने तसेच नितीन वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पाच वर्षे कार्यकाळ यशस्वीरित्या राजा गांवकर यांनी पूर्ण केला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराने मंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या ध्येय धोरणांशी अधीन राहुन तालुक्यातील विविध विकास कामांना चालना दिली. तत्कालीन मंत्री उदय सामंत आणि मंत्री भास्कर जाधव यांचेही ते निकटवर्तीय मानले जात.

त्यानंतर राजकारणातील काही वाद विवादामुळे शिवसेना पक्षात प्रवेश केला. मात्र २०१४ मालवण नगरपालिका निवडणुकीत पक्षातून झालेल्या अन्यायामुळे ते राजकारणापासून पाच वर्ष अलिप्त होते.दरम्यानच्या काळात महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅनीकुल्चरचे सदस्यत्व त्यानी स्वीकारले. तयाठिकाणी काम केले.

वर्षभरा पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृवात शिवसेना पक्षात प्रवेशकर्ते झाले.मंत्री उदय सामंत आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनखाली राजकारणात सक्रिय झाले. शिवसेना मालवण तालुकाप्रमुख पदावर त्यांची नियुक्ती झाली.राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखत घेत मंत्री दीपकभाई केसरकर यांच्या शिफारशीनुसार राजा गावकर यांची सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे. याबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!