कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली अंतर्गत नांदगाव विभागाचे आयोजन
संयुक्त जयंती महोत्सव रविवार ०७ जानेवारीला सावडाव येथे होणार संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली अंतर्गत नांदगाव विभाग आयोजित असा मनुस्मृती दहन दिन भारतीय स्त्री-मुक्ती दिन, भिमा कोरेगाव शौर्य दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती असा संयुक्त महोत्सव रविवार दि. ०७ जानेवारी सकाळी १०.०० वा. सावडाव येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नांदगाव विभागाचे आयु. सुनिल नारायण तांबे असणार आहेत.
यावेळी प्रमुख उपस्थिती अंकुश गोविंद कदम (क.ता.बाै.वि.संघ मुंबई शाखा कणकवली),संदिप सोमा तांबे (सचिव कःता बो. वि. . संघ मुंबई शाखा कणकवली), संजना संजय तांबे (सहसचिव, शाखा कणकवली), वसंत आबा कदम (सदस्य शाखा कणकवली), सजय कदम (खजिनदार शाखा कणकवली), मिलिंद सखाराम कदम (अध्यक्ष बौ म.सावडाव), सुत्रसंचलन विभावरी वसंत कदम (सावडाव) करणार असून आभार सिद्धार्थ बाबी तांबे (असलदे) करणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे :
सकाळी १०.०० वा. : धम्म ध्वजारोहण
सकाळी १०.१० वा. दिप प्रज्वलन
सकाळी १०.१५ वा. : सामुदायिक पुजापाठ
सकाळी १०.३० वा. : प्रास्ताविक आयु. विश्वनाथ कदम (सचिव नांदगाव विभाग)
सकाळी १०.४० वा. मान्यवरांचे स्वागत
सकाळी १०.४५ वा. विभागातील ज्येष्ठ सभासदांचे स्वागत-सत्कार
सकाळी ११.०० ते १२.०० विशेष व्याख्याने
विषय १ : मनुस्मृती दहन दिन अर्थात भारतीय स्त्री-मुक्ती दिन
मांडणी – आयुनी. अंकिता कुशल कदम सावडाव
विषय २ : भिमा कोरेगाव लढ्याचा जाज्वल्य इतिहास
मांडणी – आयुनी. खुशी अनिल तांबे बेळणेखुर्द
विषय ३ : शिक्षणाच्या आयप्रणेत्या क्रांतीजोती सावित्रीबाई फुले
मांडणी- आयुनी. तेजस्विनी सुनिल तांबे असलदे
दुपारी १२.०० वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ
दुपारी १.३० ते २.३० वा. स्नेहभोजन
सुभाष तांबे (असलदे) सहसचिव, गोपाळ कदम (तोंडवली) खजिनदार, विश्वनाथ कदम (कोळोशी) सचिव, सुहास तांबे (नांदगाव) उपाध्यक्ष यांनी या कार्यक्रमाचे निमंत्रक केले आहेत.












