मतिमंद मुलांच्या शाळेला वॉशिंगमशीन, खाऊ खेळाचे साहित्य दिले भेट
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व कै. अपिशेठ गवाणकर यांच्या प्रथम स्मृतिदिनी त्यांचे सुपुत्र गौरव गवाणकर यांनी करंजे येथील मतिमंद शाळेला वॉशिंग मशीन, खेळाचे साहित्य, खाऊ आदी भेट दिली.अपिशेठ गवाणकर हे आपल्या दातृत्वासाठी प्रसिद्ध होते. अनेक गरजूना त्यांनी सढळ हस्ते मदत केली होती. कै. अपिशेठ गवाणकर यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपली.यावेळी गौरव गवाणकर, महेश नार्वेकर, भालचंद्र नार्वेकर, रवींद्र बाणे,सुनील काणेकर, शिशिर परुळेकर, मिंगेल मंथेरो, सचिन कुवळेकर आदी उपस्थित होते.














