असलदे बौद्धवाडी येथे सावित्रीबाई फुले यांची192 वी जयंती साजरी केली

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे बौद्ध विकास मंडळ आणि पंचशील महिला मंडळ यांच्या यांनी संयुक्तपणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती चाहत उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेहा तांबे होत्या. व पंचशील महिला मंडळ असलदेचे अध्यक्ष अंकिता तांबे, सचिव पर्णवी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली असल्य समाज मंदिर येथे ज्ञानदात्री सावित्रीबाई फुले यांचे जयंती साजरी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधून महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सिंधुदुर्ग चे विजय चौकेकर यांनी जादूटोणाविरोधी कायदा आणि त्याबद्दल प्रात्यक्षिकासह प्रयोग सादर केले वैज्ञानिक दृष्टिकोनाची महती समजून सांगितली. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी अनिल कदम सिद्धार्थ तांबे आणि जयराम डांबरे उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत दीपेश तांबे (सचिव), सुमेध तांबे (संदेशवाहक) रंजन तांबे आणि गौतम तांबे यांनी पुष्प देऊन स्वागत केले.

या कार्यक्रमात या कार्यक्रमात नीलिमा तांबे यांनी सावित्रीबाईंची वेशभूषा सादर केली यावेळी वाडीतील सन्माननीय महिला शितल तांबे, आदिती तांबे आणि नीलिमा तांबे यांनी आपले विचार मांडले. सदर कार्यक्रमास प्रणाली तांबे, संजीवनी तांबे, सीताबाई तांबे, दिपाली तांबे, हेमलता तांबे, अनुज तांबे आणि वाडीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या कार्यक्रमात पर्णवी तांबे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाचे सांगता केली.

error: Content is protected !!