कुडाळ (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर नुकतीच निवड झालेल्या भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत यांनी आज गुरुवारी कुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे व निलमताई राणे यांची भेट घेत आशीर्वाद घेतले.यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, ऍड. संग्राम देसाई, जिल्हा बँक संचालक बाबा परब, राकेश सावंत आदी उपस्थित होते.












