आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील आर, ए, यादव हायस्कुल आडवली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सकपाळ यांनी सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. विद्यार्थी, शिक्षक यांनी सावित्रीबाई फुले यांनी स्त्री-शिक्षणासाठी केलेल्या कार्याची महती सांगितली. मुख्याध्यापक यांनी आजची स्त्री ही स्वावलंबी आहे. ती पुरुषाच्या खांद्याला-खांदा लावून काम करते आहे.रेल्वे इंजिन चालक ते अंतराळवीर होण्याचा मान तिने मिळविला आहे. अंतराळात जाण्यापर्यंत तिने मजल मारली आहे. स्त्री कुठल्याही क्षेत्रात मागे राहिलेली नाही. तिने सर्व क्षेत्रे पादाक्रांत केलेली आहेत तेव्हा आपणही चांगल्या प्रकारचे शिक्षण घेऊन यशाची शिखरे संपादन करावीत असे आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
प्रशालेमध्ये सर्व विध्यार्थ्यांना श्रीमती जान्हवी सावंत (क्रीडा प्रशिक्षक त्वायकांदो National Referee Black Belt) यांनी गेली चार दिवस Arobiks व Dance PT या विषयी मार्गदर्शन व सराव घेतला. अरुण लाड यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थांनी चार दिवस याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला. जान्हवी सावंत यांनी आपला अमूल्य वेळ प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी दिला त्याबद्द्ल सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत श्रीमती.जान्हवी सावंत यांचा मा.श्रीमती वारंग यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.