प्रजसत्ताकदिनी माजी आमदार प्रमोद जठार के ई एम हॉस्पिटलमध्ये छेडणार लाक्षणिक उपोषण

कणकवली (प्रतिनिधी) : रुग्णसेवेनिमित्त मुंबईतील केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल येथे वारंवार जात असतो यावेळी तेथे दाखल झालेल्या रूणांच्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होत असल्याचे माझ्या लक्षात आले मी स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी तोंडी सुचना दिल्या होत्या. परंतु अदयापपर्यंत या गोष्टीकडे कोणीही गांर्भियाने पाहिले नाही.

मुंबईत केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल रुग्णांचे नातेवाईक कोकण व महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातुन येत असतात. पण त्यांना राहण्याची सोय नसल्याने ते फुटपाथवर झोपतात त्यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्याता नाकरता येत नाही, कोविड सारख्या आजारामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक वायरल इनफेक्शन होऊन आजार पसरवू शकतात. यावर आपण मुंबई महानगर पालिकेच्या अर्थसंकल्पातुन सदर हॉस्पिटलच्या आजूबाजुला रूग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी महानगरपालिका प्रशासना मार्फत तरतुद करावी किंवा केईएम हॉस्पिटलच्या आवारात इमारत बांधावी व तशी तरतुद या 2024-25 करावी. या गोष्टीकडे मुंबईकरांचे व आपल्या प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मी दि. 26/01/2024 रोजी आपले केईएम हॉस्पिटलच्या आवारात माइया कार्यकर्त्यासोबत लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे.

error: Content is protected !!