कणकवली पोलिसांनी मागील वर्षात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना दिला दणका
कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरात २०८१ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करत वाहतूक पोलिसांनी सन २०२३ या गेल्या वर्षभरात १४ लाख ९५ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.ही कारवाई वाहतूक पोलीस विनोद चव्हाण , राजाराम पाटील यांनी केली आहे.
त्यामध्ये विना परवाना वाहन चालविणे , वाहतुकीस अडथळा , वाहन थांबविण्याचा इशारा केला असता न थांबणे , दारू ( मध्यपान ) पिऊन वाहन चालविणे , विना इन्सुरेन्स वाहन चालविणे, विना P.U.C वाहन चालविणे , चारचाकी चालविताना सिटबेल्ट न लावणे , विना नंबरप्लेट वाहन चालविणे , फैन्सी नंबरप्लेट , दुचाकीवर ट्रिपल सिट जाणे , विना हेलमेट वाहन चालविणे , अवैदय प्रवासी वाहतूक करणे , ‘नोंदणीकृत वाहनामध्ये बदल करणे आदी विषयात नियम न पाळलेल्या वाहनचालक व वाहनांवर ही कारवाई करण्यात आली आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग , कणकवली उपविभागिय पोलीस अधिकारी व कणकवली पोलीस ठाणे अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.












