काणेकर ट्रस्ट आयोजित चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर

कणकवली (प्रतिनिधी) : उमा काणेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चित्रकला स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून सविस्तर निकालपुढीलप्रमाणे आहे.

५ ते ६ वी गट : १. मोहित सुतार, २. साक्षी गलोले (विद्यामंदिर प्रशाला), ३. सावी मुळे, ४. जान्हवी सोनार, ५ श्रावणी सुतार (विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल) उत्तेजनार्थ-आराध्या राणे, श्रेयस सावंत, अन्वी बर्वे, आरोही मेस्त्री, भाग्येश चव्हाण (विद्यामंदिर प्रशाला)

७ ते ८ वी गट : १. अनुश्री राणे (एस. एस. हायस्कूल), २. गौरेश काडगे, ३. वेद हरमलकर (विद्यामंदिर प्रशाला), ४. तेजस मेस्त्री (शिवडाव माध्यमिक विद्यालय), ५. तुषार मेस्त्री (विद्यामंदिर प्रशाला), उत्तेजनार्थ-संकेत गावकर, आनंद विश्वकर्मा (शिवडाव माध्यमिक विद्यालय), सोहम कदम, गार्गी सावंत, यज्ञेश गावडे (विद्यामंदिर प्रशाला).

९ ते १० वी गट : १. निशांत राणे (विद्यामंदिर प्रशाला), २. पार्थ गोसावी, ३. चेतन मेखी, ४. समर्थ शिरसाट, ५. अथर्व शिरसाट (शिवडाव माध्यमिक विद्यालय) उत्तेजनार्थ-आर्यन पवार (विद्यामंदिर प्रशाला), राज पाताडे, श्रेयस शिरसाट (शिवडाव माध्यमिक विद्यालय), साई खांदारे, तानिया दळवी (विद्यामंदिर प्रशाला).

११ ते १२ वी गट : १. तन्मय सावंत, २. दयानंद शिरसाट ३. नरेश राणे (कणकवली ज्यु. कॉलेज) उत्तेजनार्थ-नेहा लाड, कस्तुरी माणगावकर (कणकवली ज्यु. कॉलेज).

खुला गट : १. वेदांत चिंदरकर, २. प्रियांश मांजरेकर, ३. विक्रांत सावंत ( बी. एस. बांदेकर महाविद्यालय), उत्तेजनार्थ विजेता आयर, विशाल चव्हाण (बी. एस. बांदेकर महाविद्यालय), राधिका पालव (कणकवली महाविद्यालय).

या स्पर्धेचे परीक्षण चित्रकार रवी शिरवलकर, अक्षय मिस्त्री, प्रथमेश घाडीगावकर यांनी केले. विजेत्या स्पर्धकांचे ट्रस्टचे अध्यक्ष महेश काणेकर यांनी अभिनंदन केले असून बक्षीस वितरणाची तारीख लवकरच कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

error: Content is protected !!