देवगड (प्रतिनिधी) : आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत चाफेड गावचे उबाठा सेनेचे सरपंच किरण मेस्त्री यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी संदिप साटम, संतोष किंजवडेकर, अमित साटम, सुभाष नार्वेकर, गणेश तांबे, सत्यवान भोगले,दिलीप पाटील,मंगेश लोके, मानसी परब, प्रतिभा मेस्त्री, सानवी मेस्त्री
आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते सरपंच किरण मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य सान्वी मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य प्रतिभा मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य मानसी परब, आत्माराम साळसकर, सृष्टी साळस्कर, सुहासिनी साळसकर, विद्या साळस्कर, देवयानी साळस्कर, लीलाधर मेस्त्री प्रकाश मेस्त्री, दिलीप पाटील,सत्यवान साटम, मंगेश साळस्कर यांनी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.













