लोरे नं 1 ग्रा पं आणि लाईफ टाईम हॉस्पिटल आयोजित मोफत आरोग्य शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

150 रुग्णांची करण्यात आली तपासणी

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत लोरे नं.1 आणि एस. एस. पी. एम. लाइफ टाइम हॉस्पिटल, पडवे यांचे संयुक्त विद्यमाने 15 वा वित्त आयोग (ग्रा.पं.स्तर) अंतर्गत आज दिनांक 20/01/2024 रोजी ग्रा.पं.सभागृहात मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. सदर शिबिरासाठी कान, नाक, घसा, डोळे व दात , जनरल सर्जरी, हृदय रोग तपासणी,स्त्री रोग तपासणी,यांचे तज्ञ डॉक्टर,औषध तज्ञ आणि परिचारिका कर्मचारी, आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर, राठोड, आरोग्यसेवक, तांबे मॅडम, राणे मॅडम तपासणीसाठी उपस्थित होते. आजच्या आरोग्य शिबिरासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे व लाभार्थ्यांचे स्वागत मा.सरपंच अजय तुळशीदास रावराणे, उपसरपंच सुमन गुरव, ग्रामपंचायत सदस्य यांचे हस्ते करण्यात आले. सदर शिबिरासाठी पंचायत समिती कणकवली चे माजी सभापती मनोज रावराणे यांनी शुभेच्छा दिल्या.व ऑपेरेशन साठी होणारा ज्यादा खर्च स्वतः करणार असल्याचे ग्वाही दिली.गावातील एकूण 150 लाभार्थ्यांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. ज्या लाभार्थ्यांना ऑपरेशन करणे आवश्यक आहे, त्याचेही ग्रामपंचायत मार्फत मोफत नियोजन करण्यात आले. सदर शिबिरासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचे व लाभार्थ्यांचे आभार नरेश गुरव, ग्रा.पं.सदस्य यांनी मानले.

error: Content is protected !!